Breaking! MPSC पास दर्शना पवार हत्या प्रकरणी मुख्य आरोपीस अटक, हत्येचे कारणही आले समोर…
उरुळी कांचन : पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली होती. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही माहिती मिळाली होती.
दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर जखमा आढळून आल्याने तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
दर्शना ही अखेरची तिचा मित्र राहुल सोबत राजगडावर जाताना दिसली होती. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राहुल एकटाच गडावरून खाली येताना दिसत होते. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होती.
अखेर पोलिसांना राहुलला मुंबई येथून अटक करण्यात यश मिळाले आहे. अटकेनंतर राहुलने दर्शनाची हत्या केल्याची कबूली दिल्याचे समजते. दर्शना पवार व राहुल हंडोरे हे नातेवाईक असून ते पुण्यात एकत्र एमपीएसस्सीची तयारी करत होते.
राहुलला दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले होते. त्यामुळेच संतापलेल्या राहुलने दर्शनाची हत्या केल्याचे समजते.
दरम्यान, दर्शना पवार आणि तिचा मित्र राहुल हांडोरे १२ जून रोजी दुचाकीवरून राजगड किल्ला परिसरात गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे गडाच्या पायथ्याशी पोहचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली.
सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आल्याचे धक्कादायक वास्तव राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रीकरणातून समोर आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले.