पुण्यातील शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल, बीडीडीएस पथक घटनास्थळी, बावधन परिसरात उडाली खळबळ..


पुणे : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन मध्ये खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत.

बावधन जवळील सुस रोड येथील एका खाजगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल गुरुवारी (ता. १३)सकाळी शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्राप्त झाला. याबाबत मुख्याध्यापिकेने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीस व बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.

सर्व शाळेची तपासणी करण्यात आली. मात्र, कुठेही बॉम्ब नसल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. सुस रोडवर ही शाळा असून या शाळेत बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित झोनमध्ये नेऊन शाळेची तपासणी केली.

मात्र काहीही न वाढवल्याने हा कोणीतरी खोडसायपणा केला असावा असा पोलिसांकून अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी हा मेल कोणी पाठवला, कुठून आला, याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले . तसेच घाबरून जावू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!