Mahesh Gaikwad : गोळीबार झाल्यानंतर ICU मध्ये उपचार घेत असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल, कारण काय?


Mahesh Gaikwad : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

महेश गायकवाड यांच्या विरोधात कल्याण मधील बांधकाम व्यवसायिकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यवसायिकाने शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केला आहे. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, परंतु गोळीबाराच्या घटनेनंतर रविवारी या दाखल गुन्ह्याचे प्रकरण बाहेर आले. कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रामअवतार पारीख (वय. ३७) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. Mahesh Gaikwad

दरम्यान, या प्रकरणांमध्ये शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील, अक्षय दिनेश गायकवाड, किरण फुलोरे, सुनील जाधव, एकनाथ जाधव आणि इतर ७० लोक यांचा समावेश आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!