Mahayuti Government : महाराष्ट्राला कोण-कोण नवे मंत्री मिळणार?, जाणून घ्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी..


Mahayuti Government : महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबरला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी २२ ते ३४ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे जवळपास १९ नेते या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, गणेश नाईक, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ अशा नव्या चेहऱ्यांना दिली जाणार असल्याची शक्यता आहे. Mahayuti Government

भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक यश आलं आहे. भाजपचे तब्बल १३२ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त राहणार आहे. दुसरीकडे ५ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

तर शिवसेनेचे ५ नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. हे सर्व नेते गेल्या सरकरमधील मंत्रीच असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे ‘हे’ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ…

देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
पंकजा मुंडे
गिरीश महाजन
आशिष शेलार
रवींद्र चव्हाण
अतुल सावे
सुधीर मुनगंटीवार
नितेश राणे
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
राहुल नार्वेकर
अतुल भातखळकर
शिवेंद्रराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
जयकुमार रावल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हे’ नेते घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ…

अजित पवार
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
दिलीप वळसे पाटील
अदिती तटकरे
धर्मरावबाबा आत्राम

शिवसेनेचे ‘हे’ नेते घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ…

एकनाथ शिंदे
दीपक केसरकर
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!