महावितरण पहिल्यांदाच देणार आनंदाची बातमी!! आता वीज दर होणार कमी, जाणून घ्या नवीन प्रस्ताव…

मुंबई : आपल्या राज्यात भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त वीज देण्याचे नियोजन आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत दर कमी होणार आहेत. तसा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे.
यामध्ये आता पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल.
महावितरणला सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा सरासरी दोन हजार मेगावॉट वीज उपलब्ध असून, नियोजन केल्यानुसार भविष्यात यात वाढ होईल, यामुळे विजेचे दर कमी होण्यास काही अडचण येणार नाही. आता सध्या महावितरणचा ८५ टक्के खर्च वीज खरेदीवर होतो. इतर घटकांवर १५ टक्के खर्च होतो.
आता नवीन प्रस्तावात १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार असून १७ फेब्रुवारीपर्यंत वीज दराच्या प्रस्तावावर सूचना, हरकती दाखल करता येतील. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल. याबाबत महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी माहिती दिली आहे.
ते म्हणाले, दिवसा जो वीज वापरेल त्याला जवळजवळ २ रुपये ४० रुपये सवलत मिळेल. विजेचे दर दरवर्षी ८ ते १० टक्के वाढणे अपेक्षित असते. असे असताना सौरऊर्जेमुळे पुढील पाच वर्षे विजेचे दर कमी होतील. त्यानुसार दर ९ रुपये ४५ रुपयांहून ९ रुपये १४ पैसे असा कमी होईल, असेही ते म्हणाले.