२३ मार्च रोजी इंदापूरात महाविकास आघाडीचा पहिला शेतकरी मेळावा!

इंदापूर : महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा येत्या २३ मार्च रोजी इंदापूरच्या बाजार समितीच्या आवारात होणार आहे. या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांच्यासह शिवसेनेचे नेते संजय राऊत, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे, आमदार संजय जगताप उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याची तयारी सध्या सुरू असून जिल्हा परीषदेचे माजी सभापती प्रविण माने यांनी या तयारीचा आढावा घेतला. यासाठी नुकतीच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सदस्य अमोल भिसे, तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारूद्र पाटील, आपचे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, भिमराव भोसले, सागर मिसाळ, छाया पडसळकर, नितीन कदम, अनिकेत निंबाळकर, इनायत काझी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.