Maharastra Politics : मविआच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर, किती उमेदवारीवर शिक्कामोर्तब? जाणून घ्या…
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. तसेच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचा निकाल लागल्याने आता महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मविआ आणि महायुतीकडून जागावाटपाची चर्चा लवकरात लवकर आटोपण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाला वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी २४० ते २५० जागांवरील मविआचे जागावाटप पार पडले आहे. तर उर्वरित ४० ते ५० जागांचा तिढा अजूनही सुटला नसून त्याबाबत मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
महाविकास आघाडीचे नेते बुधवारी विदर्भातील तिढा असलेल्या जागांबाबत चर्चा करणार आहेत. काही जागांवर तिढा कायम राहिल्यास तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तिढा सोडवला जाईल. तर उर्वरित एकमत झालेल्या जागांबाबत मविआकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. Maharastra Politics
जेणेकरुन उमेदवारनिश्चिती आणि पुढील प्रक्रियेला सुरुवात करता येईल. त्यामुळे मविआच्या आजच्या बैठकीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विदर्भातील बहुतेक जागांबाबत मविआच्या नेत्यांमध्ये चर्चा पूर्ण झाली असून आता १० ते १५ जागांबाबत पुन्हा एकदा आजच्या बैठकीत चर्चा होईल. महाराष्ट्रातील विविध विभागातील ज्या जागांवर तिढा आहे अशा ४० ते ५० जागांमध्ये ज्या जागांचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न बैठकीत होईल. ज्या जागांवर तिढा कायम राहील त्या महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील, असे सांगितले जाते.