महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यूचा आकडा 11 वर, कार्यक्रमावर होतेय टीका..
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र या कार्यक्रमात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या सोहळ्यात उष्मघातामुळे श्रीसदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. तर 24 जणांवर नवी मुंबईच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या श्रीसदस्यांची काल रात्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी भेट घेतली.
यामुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. जर अमित शाहांना जायचं होतं म्हणून जर संध्याकाळचा कार्यक्रम दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कुणी करायची?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे.
आम्हाला सांगितलेला मृतांचा आकडा 11 आहे. पण हा आकडा दुर्देवाने वाढूही शकतो, असंही ते म्हणालेत. यामुळे सध्या या कार्यक्रमावर टीका केली जात आहे. यामुळे सरकारवर देखील टीका होत आहे.