Maharashtra : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकार शब्दाला जागणार? शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? महत्त्वाची माहिती आली समोर…

Maharashtra : लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी महायुती सरकारची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी मोठी घोषणा केली होती. म्हणून महायुतीने सत्ता स्थापित केल्यापासून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापित झाले असले तरी अजून नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. पण, आज-उद्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे वृत्त समोर आले आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

सोमवारपासून अर्थातच १६ डिसेंबर पासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. नागपुरात हे अधिवेशन संपन्न होणार असून या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल का? याबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. Maharashtra :
दरम्यान आता याच संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली होती.
त्यामुळे या अधिवेशनातही कर्जमाफी होईल, अशी शेतकऱयांची अटकळ होती. पण, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. म्हणून कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनातं होणार नाही, असे चित्र आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. याबाबत सहकार विभागातील सूत्रांशी संपर्क साधला असता कर्जमाफी देण्यासाठी तयारीबाबत कोणतेही निर्देश अद्याप देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
