महाराष्ट्राला मिळणार तिसरा उपमुख्यमंत्री? महत्वाच्या माहितीने राजकारणात खळबळ, नेमकं घडतंय काय?


मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तोफ दिवसागणिक आग ओकत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी शिंदे सेनाच फुटीवर असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दावोस दौऱ्यात महाराष्ट्रीतील गुंतवणुकीची चर्चा न होता महायुतीमधील भूकंपाची चर्चा अधिक रंगली.

दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाला भगदाड पाडण्याचा दावा केला आहे. तर आज संजय राऊत यांनी सकाळीच मोठा बॉम्ब टाकला. राज्याला नवीन तिसरा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलाय असं मी मानतो. एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख नाही किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाही. एकनाथ शिंदे हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी ज्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलं आहे.

तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे, त्या पैशाच्या माध्यमातून संस्था विकत घेणं त्यातून निवडणुका जिंकणं याला राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे वेश्येचं राजकारण म्हणायचे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेचं प्रकरण गांभीर्याने घेऊ नये, त्यांनी पालकमंत्रपदाचा वाद सोडवावा. काल मुख्यमंत्री होते, स्वत:ते उपमुख्यमंत्री आहेत, आता तेही राहणार नाहीत. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय तो त्यांच्याच पक्षातील आहे, याचा त्यांनी विचार करावा. मी नाव घेत नाही, घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत.

राज्याला भविष्यात तीन मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे. याचं वजन कुठे होतं. सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात ना तसे हे अमित शहांनी हवा भरलेले नेते आहेत. बाळासाहेबांनी यांना भरपूर दिलं, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती. आता काय आहे?, असं म्हणत संजय राऊतांनी थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!