Maharashtra Weather : राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस, आज कसं असेल हवामान? कुठं पडणार पाऊस, जाणून घ्या…
Maharashtra Weather : मागच्या आठवड्यापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.मात्र, अजूनही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गेल्या काही दिवसापासून पावसानं उघडीप दिली होती.
पण आजपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे. Maharashtra Weather
तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, बीड, नांदेड यासह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.