Maharashtra Weather : कुठे पाऊस तर कुठे थंडी, असा असेल महाराष्ट्रातील हवामान, जाणून घ्या…


Maharashtra Weather : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच उद्यापासून म्हणजेच शुक्रवार (ता.८) राज्यातील वातावरण कसे असणार याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा ६ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून म्हणजे ८ डिसेंबरपासून वातावरण पूर्णपणे निवळून थंडीला सुरवात होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या थंडीला अडथळाही आता दूर होऊन पूरकता मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील फळबागांना होणारा धोका, लाल कांदा काढणी, उन्हाळ कांदा लागवड यासारख्या शेतकामांसाठीची गैरसोयही टळू शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

दरम्यान, १३ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची Maharashtra Weather शक्यता अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्र भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सोमवार म्हणजे ११ डिसेंबर ते बुधवार दिनांक १३ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!