अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला! ७ वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार, नंतर घडलं भयंकर….


नांदेड : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नांदेड शहरात घडलेल्या एक धक्कादायक घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर तिच्याच शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. १९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

तसेच मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघड झाली. मुलगी सतत शाळेत जाण्यास नकार देत असल्याने आईने तिच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. तातडीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

या प्रकरणाची गंभीरता पाहता नांदेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये न्याय मिळवण्यासाठी विलंब होऊ नये, यासाठी जलद न्यायालयीन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिक्षकांवर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवत असतात. मात्र सुरक्षा असावी अशी अपेक्षा असताना शिक्षकाकडूनच अशा प्रकारचा घृणास्पद कृत्य झाल्याने शहरातील पालकांमध्ये भीती आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक पडताळणी प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

नांदेडसारख्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहरात घडलेल्या या घटनेने नागरिक आक्रोशित झाले आहेत. स्थानिक नागरिक, पालक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. समाजाने अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कायदे आणि अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!