Maharashtra Vidhan Sabha Elections : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, २० नोव्हेंबर रोजी मतदान, ‘या’ तारखेला निकाल…
Maharashtra Vidhan Sabha Elections : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे. Maharashtra Vidhan Sabha Elections
२० नोव्हेंबरला होणार मतदान..
अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळणार आहे.