महाराष्ट्र पुन्हा हादरला! ३१ वर्षीय नराधमाचा ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, घटनेने खळबळ..


परभणी : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर पडक्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर सराईत गुन्हेगार दत्ता गाडेनं जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आता परभणीमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

बत्तीस वर्षीय नराधमाने आठ वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्यातील धक्कादायक ही घटना आहे. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हलगरा या गावात धक्कादायक घटना घडली आहे.

एका ३२ वर्षीय व्यक्तीने आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार आहे. आरोपीच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवण्यासाठी बोलून घेऊन आरोपीने कुकर्म केले आहे. अल्पवयीन मुलीने घरातील लोकांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर नराधमाचा शोध सुरू झाला होता. त्यापूर्वीच आरोपी पळून जाण्याची यशस्वी झाला होता. औराद शहाजाणी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!