Maharashtra : मोठी बातमी! शरद पवार उद्धव ठाकरेंनी भाकरी फिरवली, महायुतीचे स्वप्न भंगले…..
Maharashtra : लोकसभा निवडणूक २०२४ चे कल हाती येत आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मोतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला हाती आलेल्या कलांनुसार भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट १० जागांवर आघाडीवर आहे. तर, त्यातुलनेने अजित पवार गट मात्र पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूतीचा फायदा असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाचे १० उमेदवार आघाडीवर आहेत. Maharashtra
तर, शिंदे गटाचे ७ उमेदवारांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे आता राज्यात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि बंडखोरी यामुळं महाविकास आघाडीला सहानुभूती मिळाल्याचे चित्र आहे. ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाला सहानुभूतीचा फायदा झाल्याचा तर्क वर्तवला जात आहे.