भयंकर अपघाताने महाराष्ट्र हादरला! वणी-नाशिक मार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू..


नाशिक : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत. आता वणी-नाशिक रस्त्यावर दिंडोरी तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.

या घटनेत देविदास पंडित गांगुर्डे (वय 28), मनीषा देविदास गांगुर्डे (वय 23), उत्तम एकनाथ जाधव (वय 42), अल्का उत्तम जाधव (वय 38), दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय 45), अनुसया दत्तात्रेय वाघमारे (वय 40), भावेश देविदास गांगुर्डे (वय 2) यांचे निधन झाले आहे. कार पाण्याच्या नाल्यात उलटल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी अडचण आली.

मृतांचे शव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. या गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात जाऊन पलटी झाली.

यामध्ये कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले. अपघातानंतर कारमधून लगेच कोणाला बाहेर पडता आले नाही. यामुळे सगळ्याचे जीव गेले. कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर तोल गमावलेल्या कारने थेट पाण्याने भरलेल्या नाल्यात पलटी घेतली.

अपघात इतका भीषण होता की, कारमधील सर्व सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात एका कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात या गाड्यांचा पूर्ण भुगा झाला आहे. पोलीस सध्या याठिकाणी तपास करत आहेत. घटनेने हळहळ व्यक्त केली जास्त आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!