महाराष्ट्र हादरला! भोंदूबाबाकडून 500 महिलांचे शोषण? आता धक्कादायक माहिती आली समोर…


पुणे : नाशिक येथील तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत रोज अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून यामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत.
त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

तसेच त्यांच्याकडे तब्बल 500 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा दावाही केला जात आहे. एका महिला नेत्याने हा दावा केला असून उच्चभ्रू महिलाही त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्याचा दावा या महिला नेत्याने केला आहे. यामुळे अजून मोठी खळबळ उडाली आहे.

संगिता तिवारी या गुलाबी गँगच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच अजित पवार यांच्या घराबाहेर झालेल्या कथित जादूटोण्याच्या घटनेचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जात असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर कथित जादूटोणा करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता.

या प्रकरणामागे नाशिकमधील आरोपी अशोक खरात याचा हात असू शकतो, अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या घराबाहेर झालेला कथित जादूटोणा आणि काळी जादू ही त्यांच्या स्वतःच्या पक्षातील काही लोकांनीच केल्याचा खळबळजनक आरोपही केला जात आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यात आला असून, या प्रकरणात एसआयटीनेही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!