महाराष्ट्राचा निकाल अनाकलनीय , अनपेक्षित ! उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया …!


Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections) निकालावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीला अपेक्षेप्रमाणे 50 पेक्षा कमी जागांवर यश मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीला प्रामाणिकपणे मतदान केलेल्या नागरिकांचे आभार मानले, परंतु या निकालाचे विश्लेषण करताना ते म्हणाले, हा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “जणू काही लाटेपेक्षा त्सुनामीच आली आहे.” यावेळी त्यांनी भाजपच्या विजयावर शंका व्यक्त करत, “सामान्य जनतेला हे समजले की नाही हे महत्त्वाचे आहे.” ते म्हणाले, “लोकांच्या भावना काय आहेत हे लक्षात घेतल्यास, लोकांनी भाजपला मते सोयाबीन, कापसाच्या भावातील घसरगुंडी, गुजरातमध्ये उद्योग वळवले जाणे, महिलेच्या सुरक्षेबाबत उदासीनता यामुळे दिली का?” याबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी, “प्रेमापोटी नाही, पण रागापोटी ही लाट उसळली असं दिसतं.

 

त्यांनी पुढे एक दीड वर्षापूर्वी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी “एकच पक्ष राहील” अशी भविष्यवाणी केली होती, त्यावर भाष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले, “हे भविष्यातील दिशेसाठी एक धोक्याची सूचना आहे. ‘वन नेशन, वन पार्टी’ च्या दिशेने ही पुढे चाललेली वाट आहे.” अशा शब्दांत त्यांनी या निकालावर चिंता व्यक्त केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!