Maharashtra Rain : महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना अती मुसळधार पावसाचा इशारा…


Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई आणि कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आता राज्यात वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे १९-२१ जुलै दरम्यान कोकण,पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार-अति मुसळधार पाऊस पडणार आहे. Maharashtra Rain

दरम्यान, गुरुवारपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या मरबार हिल परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!