Maharashtra : पुण्यासह राज्यातील ३८८ विकासकामांच्या प्रकल्पाची नोंदणी स्थगित, महारेराचा बिल्डरांना मोठा दणका..

Maharashtra मुंबई : महारेराकडे जानेवारीत नोंदवलेल्या ७४६ प्रकल्पांनी २० एप्रिलपर्यंत स्थावर संपदा अधिनियमानुसार माहितीचा तपशील असलेले प्रपत्र १,२ आणि ३ संकेतस्थळावर नोंदवणे, अद्ययावत करणे अत्यावश्यक होते. Maharashtra
याची पूर्तता न करणाऱ्या विकासकांना आधी १५ दिवसांची आणि नंतर कलम ७ नुसार प्रकल्पाची नोंदणी रद्द किंवा स्थगित का करू नये अशी गंभीर स्वरूपाची ४५ दिवसांची नोटीस महारेराने बजावलेली होती. यालाही प्रतिसाद न देणाऱ्या ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे.
ग्राहकाला याबाबतची प्राथमिक माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी स्थावर संपदा अधिनियमात ही कायदेशीर तरतूद केली आहे. बिल्डरची उदासीनता म्हणजे ग्राहकांच्या हक्काचा भंग आहे, असे गृहीत धरून महारेराने ही कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, कारवाई केलेल्या शेकडो विकासकांना याबाबतचे आदेश इ-मेलवर पाठविले असून, उर्वरित विकासकांनाही येत्या २ ते ३ दिवसांत हा निर्णय कळविण्यात येणार आहे.
जानेवारी २०२३ मध्ये नोंदवलेले हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांनी २० एप्रिलपर्यंत तिमाही प्रपत्रे नोंदवणे, अद्ययावत करणे आवश्यक होते. सुरूवातीला तर फक्त ३ जणांनी ही माहिती अद्ययावत केली होती. नोटिस पाठविल्यानंतर ३५८ जणांनी प्रतिसाद दिला, तर ३८८ जणांनी दखल घेतली नाही.
ग्राहकांना सक्षम करणारे आणि अधिनियमानुसार अत्यावश्यक असणारे हे तपशील आणि त्याची सर्व प्रपत्रे विहित कालावधीनुसार अद्ययावत असावी , यासाठी महारेराने प्रकल्पांच्या तिमाही वित्तीय प्रगती अहवालाचे सनियंत्रण पहिल्या तिमाही पासून करायला सुरूवात केलेली आहे. त्याचाच भाग म्हणून महारेराने विनियामक तरतुदींची पूर्तता न करणाऱ्या या जानेवारीमध्ये नोंदविलेल्या विकासकांवरही कठोर कारवाई केलेली आहे.