Maharashtra Politics : …तर अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिली कबुली
Maharashtra Politics मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत सातत्याने नवनव्या बातम्या येत असतात. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार Ajit Pawar यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू असे वक्तव्य केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले की एकनाथ शिंदेच Eknath Shinde मुख्यमंत्री राहतील. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वात लढू. राज्यात सीएम बदलणार नाहीत. अजित पवारांना बनवायची वेळ आली तर त्यांना ५ वर्षांसाठी बनवू, असे मोठे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रस्ताव प्रशासन मंत्री धर्मरावबाबा यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा अर्थच उलगडून सांगितला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, पाच वर्षाकरिता होईल की आणखी काय होईल हे माहीत नाही मात्र अजित दादाच मुख्यमंत्री होणार आहेत. लवकरच ते मुख्यमंत्री होतील. असा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.