Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग! रात्री मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची ‘वर्षा’वर बैठक, २ तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं?
Maharashtra Politics मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच काळ रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अचानक घडामोडी वाढल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमरास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ‘वर्षा’वर दाखल झाले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास बैठक चालली.
या बैठकीमध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. अजित पवार वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नसल्याने पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान गणेशोत्सवामध्ये अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. त्यानंतर आता अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झाले.
तसेच अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या विस्ताराकडे आमदारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न या महत्त्वांच्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली आहे.