Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात होणार पुन्हा मोठा भूकंप?, महत्वाची माहिती आली समोर..
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
अशातच आता आगामी निवडणुकीत उमेदवारी दिली नसल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील हे नाराज झाले आहेत. अशातच ते खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
संजय राऊत यांच्याशी चर्चा करून ते ठाकरे गटात प्रवेश करून आपला निर्णय जाहीर करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. आता यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Maharastra Politics
सुषमा अंधारे म्हणाल्या, उन्मेश पाटलांचे माहिती नाही. मात्र हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील. असे मोठे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केल आहे. Maharashtra Politics
दरम्यान, पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी वंचितसोबतच्या आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे. वं”चितन आमच्यासोबत यावं, असे आम्हाला खूप आधीपासून वाटत होतं आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न केले, असे देखील ते म्हणल्या आहेत.