Maharashtra Politics : गृह खात्यानंतर आणखी एक खातं जाणार? शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा ‘दे धक्का’, नेमकं घडतंय काय?


Maharashtra Politics : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आणि आमदारांनी शपथग्रहण केल्यानंतर आता सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. अशातच आता सत्ता वाटपाचा तिढा कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटपाचा तिढा सुटला असल्याची चर्चा होती.

मात्र, हा तिढा कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला गृह खातं मिळावं या मागणीवर ठाम असल्याची चर्चा होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह खातं मिळणार नसून आणखी एका महत्त्वाचे खाते गमवावे लागणार आहे. Maharashtra Politics

दरम्यान, भाजपच्या वाट्यातील केवळ दोनच खाती हे मित्रपक्षांना जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महसुल आणि गृहनिर्माण ही दोनच खाती मित्रपक्षांना देण्याची भाजपची तयारी आहे. नगरविकास खाते शिवसेनेला मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या खात्याऐवजी शिवसेनेला महसूल खातं शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये खातं वाटप जवळपास अंतिम करण्यात आले आहे. मंत्र्यांच्या नावाच्या यादीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खाते वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!