Maharashtra Politics : वारं फिरलं! उद्धव ठाकरेंनी टाकला नवा डाव, विधानसभेपूर्वीच भाजपला खिंडार? मोठे नेते सोडणार पक्ष…
Maharashtra Politics : आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचा मोठा नाराज गट शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याची शक्यता आहे.
नाराज गटामध्ये भाजपचे पदाधिकारी राजू शिंदे यांच्यासह सहा ते सात नगरसेवक आणि काही जिल्हा परिषद सदस्य देखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, ७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. लोकसभेत भाजपने शिवसेनेचं काम केलं आणि संदीपन भुमरे निवडून आले. त्यानंतर संजय सिरसाट यांनी साधे आभार सुद्धा मानले नाहीत. मग आम्ही काय फक्त शिवसेनेचे काम करायचे? असा सवाल राजू शिंदे यांनी केला आहे. Maharashtra Politics
राजू शिंदे पश्चिम मतदार संघातून संजय सिरसाट यांच्या विरोधात उभे होते, त्यांना ४० हजार मते पडली होती. आता पुन्हा विधानसभा तिकीट मिळेल की नाही अशी शंका असल्याने राजू शिंदे आपला गट घेऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून, महाविकास आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील अशी माहिती समोर येत आहे.