Maharashtra Politics : मोठी बातमी! शिवसेना नाव आणि चिन्ह कोणाचे, सर्वोच्च न्यायालयाने आज दिला महत्वाचा निर्णय…
Maharashtra Politics नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी गेल्यावर्षी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हा आमदार, खासदारांच्या बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. Maharashtra Politics
यावर आज पुन्हा एकदा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे.बी. पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. यावेळी, तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ, असे सरन्यायाधीशांनी सांगितले आहे. तत्पूर्वी झालेल्या सुनावणी, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यांवर नाराजी व्यक्त करत ताशेरे देखील ओढले आहे.
आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड , न्यायाधीश जे. बी. पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना वकील कपिल सिब्बल म्हणाले, शिवसेना चिन्हाचे प्रकरण तुम्हाला ऐकावे लागेल. कृपया तारीख निश्चित करावी. त्यावर, तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.
दरम्यान, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. ११ मे च्या निकालानंतर काहीही झालेले नाही. ठराविक वेळेत घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटलं होतं. पण, ११ मेनंतर काहीही झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले आहे