Maharashtra Politics : घात झाला!! तुमचे पैसे आमच्या वस्तीत पोहचलेच नाहीत, बड्या नेत्या समोरच कार्यकर्त्यांचे वक्तव्य
Maharashtra Politics : जालना जिल्हयातील घनसावंगी मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार, महायुतीचे हिकमत उधाण यांनी माजी आमदार राजेश टोपे यांचा दारुण पराभव केला. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून एक हाती सत्ता राबवणारे राजेश टोपे यांना पराभव पचवणं अवघड जात आहे.
इतक्या वर्षांचं राजकीय वर्चस्व एका क्षणात हिरावल्याने त्यांनी नुकतंच आपल्या मतदार संघात पराभवाची कारणं शोधण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्या दरम्यान एक अतिउत्साही कार्यकर्ता गर्दीतून वाट काढत थेट राजेश टोपे यांच्या गाडीपाशी पोहोचला. आणि कमालीची बाब म्हणजे त्याने या घटनेचा व्हिडीओ देखील चित्रीत केला आहे. Maharashtra Politics
काय म्हणाला कार्यकर्ता?
कार्यकर्त्याने राजेश टोपे यांना सांगितले की, साहेब तुम्ही दिलेले पैसे आमच्या पर्यंत आले नाही. तुम्हाला धोका दिला आहे. तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केले नाहीत ते पैसे त्यांनीच खाल्ले आहेत. त्यामुळे तुमचा पराभव झाला आहे. Maharashtra Politics
तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमचे पैसे स्वतः खाल्ले, असे राजेश टोपे यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या व्हिडिओची चर्चा होत आहे.