Maharashtra Politics : अजितदादांना धक्का! माजी मंत्री रामराम ठोकणार, तुतारीही फिक्स झाली…
Maharashtra Politics : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसेच्या निवडणुका जाहीर होताच तुतारी हाती घेण्याकडे अनेकांचा ओढा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील त्यांचे निवासस्थान असलेल्या मोदीबागेत मंगळवारी रीघ लागली होती.
यात प्रामुख्याने अजित पवार यांच्यासोबत असलेल्या सहकारी होते. अशातच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही दादांना धक्का देण्याची तयारी केली आहे. Maharashtra Politics
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. निवडणूक कशी लढावी, कुठून लढावी यासंदर्भात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आज बैठक संपन्न झाली.
तुतारी चिन्हावरच लढावे, अशी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचे सांगत मी कार्यकर्त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही, असे उघडपणे शिंगणे यांनी सांगत काहीच दिवसांत पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहे.