Maharashtra Politics : मोठी बातमी! शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव, जाणून घ्या..
Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या गटाला आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश दिला होता. आदेशानुसार निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने तीन नावांचा प्रस्ताव दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाकडून दिलेल्या तीन नावांपैकी पहिलं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, दुसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस असे आहे. Maharashtra Politics
जरी निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवला असला तरी त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवला नाही. कारण राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर केला जात नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवला नाही.
दरम्यान, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. यामागेदेखील एक कारण आहे. राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवण्यात आलेला नाही.