Maharashtra Politics : राजकारणातील मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा…


Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची घडामोड समोर येत आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी (ता.२१) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये चहापान झाले. दरम्यान या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Maharashtra Politics

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ऐतिहासिक ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका संस्थेच्यावतीने शनिवारी प्रतिष्ठानच्या सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात सकाळी शरद पवार यांनी सहभाग घेतला होता. आपले विचार मांडल्यानंतर ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आपल्या कार्यालयात बसले होते.

पवार यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी या ग्रंथामागील बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट केली. त्यांचे भाषण संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेडकर यांना पवार यांच्यासोबत चहापान घेण्याचे विनंती केली. राजकीय चर्चा न करता या दोन्ही नेत्यांमध्ये सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे समजत आहे. Maharashtra Politics

पवार आणि आंबेडकर यांच्यातील राजकीय वाद कायम चर्चेत असतो. त्यातच या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या दोघांचा विरोधक भाजप आहे. महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी वंचितला सोबत घेतले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला. त्यानंतर राष्ट्रवादीतून अजित पवार गट वेगळा झाला. यानंतर महाविकास आघाडी कमकुवत झाली. दरम्यान राज्यात वजाबाकीचे राजकारण होत असताना बेरजेचे राजकारण सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!