Maharashtra Politics : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचाही लागणार कोणत्याही क्षणी निकाल, पक्ष नेमका कोणाचा? नेत्यांची धाकधूक वाढली…

Maharashtra Politics : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे.
आता पुन्हा एकदा राज्याचे लक्ष लागले आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी नेमकी कोणाची?, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याबाबतचा निवडणूक आयोगातील निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो नंतर निकाल अद्याप आलेला नाही. निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष नेमका कुणाचा? याबाबत आपल्याला स्पष्टता मिळणार आहे. Maharashtra Politics
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी आठ डिसेंबरला पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला होता.
मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीसंदर्भात लवकरच निकाल येऊ शकतो. या येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.