Maharashtra Politics : विधानसभेसाठी मविआच्या बैठका, ‘या’ जागांवर झाली सहमती, बड्या नेत्याने दिली महत्वाची माहिती…
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मविआच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मविआच्या नेत्यांनी जागा वाटपासाठी आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत.
या तीन बैठकांमध्ये १२५ जागांवर सहमती झाल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगरमध्ये बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्हाला महायुतीचे आव्हान वाटत नाही.
कारण राज्यातील जनतेने या सरकारला नाकारले आहे. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा जास्त जागा मिळणार आहे, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.
महायुती आणि आमची तुलना करू नका. महायुतीत जागा वाटपावरून मारामारी होत आहे. आमच्याकडे मैत्रीपूर्ण चर्चा होत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. Maharashtra Politics
सर्वोच्चन न्यायालयाचे न्यायाधीश सी.जे.चंद्रचूड यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. त्यांनी गणपतीची आरती केली. त्यावर बोलताना थोरात यांनी देशातील न्यायाधीशांवरही दबाव असल्याच्या चर्चा सुरु असल्याचे म्हटले.