Maharashtra Politics : घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होणार महायुतीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी? आतली माहिती आली समोर…


Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षाला विधानसभेच्या किती जागा मिळणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर बैठकांचे सत्र सुरूच आहे.

सह्याद्री अतिगृहात महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतचे १०० उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे ५०, शिवसेनेचे ३६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे १४ उमेदावरांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे.

उद्या उमेदवारांची पहील यादी महायुतीकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. बहुतांश विद्यमान आमदारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवाय स्टार प्रचारकांच्या नावावर देखील आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!