Maharashtra Politics : मी एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार असेल, तर मला फाशी द्या!! ठाकरे गटाच्या उमेदवाराचं मोठं वक्तव्य..
Maharashtra Politics : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घोषित केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारे वाहतं आहे. कोकणातही यंदा तगडी लढत होत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आज बोलताना एक विधान केलं. ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आज तुम्ही भर उन्हात बसले आहात मी तुमचे ऋण कधी विसरणार नाही. Maharashtra Politics
आज माझे बाबा नाहीत आज त्यांना आनंद झाला असता. ५० खोके मंत्री बघून मी नाही गेलो. मला अनेक ऑफर होत्या. माझ्यावर एक रुपयाचा भ्रष्टाचार असेल तर मला फासावर लटकवा, असं वैभव नाईक म्हणालेत. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाबतीतील भ्रष्टाचार मी बाहेर काढला. तेव्हा माझ्या कुटुंबाने पाकिस्तानमध्ये जावं अस सांगण्यात आलं. असे विरोधक दुष्मानाला सुद्धा मिळू नये. कणकवलीचे आमदार मी विकास केला नाही अस सांगत होते.
तुमच्या कडे भ्रष्टाचार मुक्त विकास काम झाले असतील तर सांगा आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतो. अनेक विकास काम मी केली. केसरकरांनी केवळ आश्वासन दिली, असं म्हणत वैभव नाईक शिंदे गटावर टीका केली आहे.