Maharashtra Politics : हरियाणात भाजपा कशी जिंकली? आता तो गेमचेंजर फॅक्टर महाराष्ट्रातही, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय…


Maharashtra Politics  :  हरियानाच्या विजयानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. हरियाणात अनपेक्षितपणे विजय मिळविल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. राज्याच्या होणाऱ्या निवडणुकीत या विजयाचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हरियाणा विजयाचा पॅटर्न राज्यात राबविण्यात येणार आहे.

राज्यातील महायुती सरकारने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला असल्याची चर्चा आहे. ओबीसींमध्ये राज्यातील नव्या जातींचा समावेश केल्यानंतर आता ओबीसींना मोठी भेट राज्य सरकार देणार आहे.

हरियाणात ओबीसी समाजाची क्रिमीलेअर उत्पन्न वाढीची प्रलंबित मागणी पूर्ण केल्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला. आता राज्यातील महायुती सरकारदेखील असाच निर्णय घेणार आहेत.

महाराष्ट्र सरकारही हरियाणाच्या राजकारणातील गेमचेंजर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. राज्यात ओबीसींच्या क्रिमीलेअरची मर्यादा ८ लाखांहून १५ लाख इतकी करण्यात येणार आहे. या उत्पन्न मर्यादावाढीमुळे ओबीसी समाजातील अनेकजण ओबीसी आरक्षण प्रवर्गात येणार आहे. Maharashtra Politics

अधिकारी वर्गदेखील या निर्णयाने आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातही ओबीसी कार्ड महायुती चालवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!