Maharashtra Politics : मोठी बातमी! अखेर खाते वाटपाचा तिढा सुटला, गृह ऐवजी एकनाथ शिंदे यांना कोणतं खातं? जाणून घ्या…


Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गृह खात्याची मागणी केली होती. मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याने गृह विभागासारखं महत्त्वाचं खातं देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली. मात्र, भाजपने नकार दिला. आता, यावर तोडगा निघाला आहे.

खाते वाटपाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री खलबतं झाली. या चर्चांमध्ये खाते वाटप आणि मंत्र्यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता, सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आपल्याकडील दोन महत्त्वाची खाती शिवसेनेला देणार आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारातील मोठी अडचण दूर झाली असल्याचे म्हटले जात आहे. Maharashtra Politics

मिळालेल्या माहिती नुसार, शिवसेनेला महसूल खाते मिळणार आहे. मित्र पक्षाचा मान ठेवण्यासाठी आणि मंत्रिमंडळात सत्तेचा समतोल ठेवण्यासाठी भाजप आपल्याकडील दोन महत्त्वाची खाती देणार आहे. शिवसेनेला महसूल खाते आणि आणखी एक महत्वाचे खाते दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान , उपमुख्यमंत्री पद हे नामधारी पद आहे. यासोबतच महत्वाचे खाते दिल्यास पक्षाचा मान राखला जाईल अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती. मुख्यमंत्री पदाच्या बरोबरीने गृहमंत्री, अर्थमंत्री आणि महसूलमंत्री या पदाला मान आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपकडे गृहखाते होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थमंत्री खातं होतं. यामुळे मंत्रिमंडळात एकप्रकारचा समतोल राखला गेला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!