Maharashtra Politics : अखेर ठरलं! नवीन सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली, ‘या’ ठिकाणी होणार शपथविधी सोहळा…

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी रात्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली
महाराष्ट्राचे विद्यमान कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना आधीच पाठिंबा दिला आहे. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नाहीत अशीही चर्चा आहे. Maharashtra Politics
कालच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नवीन सरकार कधी स्थापन होणार अशी चर्चा सुरु आहे. त्यात आता ही माहिती समोर आली आहे. नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळेल हे देखील उत्सूकतेचं ठरणार आहे. कारण चर्चा अशी ही आहे की, काही नवीन लोकांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.