Maharashtra Politics : फक्त ८० जागांवर चर्चा होणार!! इतर जागांचा प्रश्नच येत नाही, भाजप नेत्याने मोठं वक्तव्य करून शिंदे, अजित पवारांना फोडला घाम…
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.
भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे वाढलेले आहेत. महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. लोकसभेला भाजपला मोठा फटका बसला त्यामुळे आता विधानसभेला भाजप मोठा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान आता भाजपाने रणनीती आखली आहे. विधानसभेला जास्तीत जास्त जागा लढण्याचा आणि जिंकून आणण्याचा भाजपचा संकल्प आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी जागावाटपावरून मोठे वक्तव्य केले आहे. जे आमदार आहेत त्या जागांवर जागा वाटपाची चर्चा होणार नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. आमच्याकडे २०८ आमदारांचा पाठिंबा आहे. Maharashtra Politics
यामुळे वाटपाच्या बैठकीत यावर चर्चा करण्याची गरजच नाही. उरलेल्या ८० जागांवर वाटपाची चर्चा केली जाणार आहे, असे शेलार यांनी सांगितले. शेलार यांनी बुधवारी जो दावा केला आहे त्यावरून अजित पवार गट आणि शिंदे गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले आहेत. भाजपने १५० ते १६० जागा लढाव्यात आणि मित्रपक्ष असलेली शिंदेसेना आणि अजित पवार गटाने उर्वरित जागा लढवाव्यात, असे शहा यांनी सुचविल्याची खात्रीलायक माहिती आहे. भाजप काही केल्या १५० जागांखाली येण्याची शक्यता नाही. यामुळे शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा येतील.
दरम्यान, शिंदे यांच्यासोबत स्वतःचे ४० व १० अपक्षांसह ५० आमदार आहेत. अजित पवार गटाकडे काँग्रेसच्या ३ आमदारांसह ४४ आमदार आहेत. शिंदे व अजित पवार गट मिळून आमदार संख्या ९४ इतकी आहे.