Maharashtra Politics : महाराष्ट्रात महायुतीचा मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला! भाजपला २०, शिवसेना १२, राष्ट्रवादीला १० मंत्रीपदे…


Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या महायुतीला घवघवीत यश मिळाले. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागला असली तरी शपथविधी सोहळ्यासाठी बारा दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. त्यामुळे महायुतीमधील घडामोडींसंदर्भात राज्यातील जनतेलाच नाही तर सर्वच आमदारांना प्रतिक्षा लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधावरी रात्री भेट घेतली. या भेटीवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते.

या बैठकीत महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार? यावर निर्णय झाल्याचे समजते. यानुसार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अनुक्रमे २०, १२, १० मंत्रीपदे या सुत्रांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. Maharashtra Politics

दरम्यान, ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडली.

या बैठकीमध्ये महाराष्ट्रात मंत्रिमंडळातील खातेवाटपाचे आणि कोणाला किती मंत्रीपदे याविषयीचे सूत्र ठरवण्यात आल्याचे समजते. सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडे २० कॅबिनेट मंत्रीपद असण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे १० कॅबिनेट मंत्रीपदी असू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!