Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री उशिरा प्रदीर्घ बैठक, नेमकं शिजतंय काय?


Maharashtra Politics  : राज्याच्या राजकारणात चाललंय तरी काय? असा प्रश्न काल (सोमवारी) रात्रीपासून सर्वांना पडला आहे. याचे कारणंही तसंच आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपुरातून दाखल झाले होते. बंद खोलीत ही बैठक सुमारे दीड तास चालली.

लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली असताना ही बैठक झाली. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनही २७ जूनपासून राज्यात सुरू होत आहे.

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महायुतीची खराब कामगिरी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणेही उपस्थित होते. दरम्यान, आज दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक होत आहे. राज्याचे नेते दिल्लीत वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार आहेत. फडणवीस राज्यातील ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत. Maharashtra Politics

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्यांदरम्यान संजय राऊत यांचेही मोठे वक्तव्य समोर आले आहे. महायुती सरकारचा खरपूस समाचार घेत राऊत म्हणाले, सर्वांना मंत्री करा, तीन-चार महिने बाकी आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!