महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे…!


मुंबई : उद्या 26 जानेवारी या दिवशी भारतीय प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ मानाने आपल्या राजपथावरून संचलन करत राष्ट्रपती पंतप्रधान आणि मान्यवर पाहुण्यांना आपल्या राज्याची कला सादर करेल.

विविधतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याला आजपर्यंत 1993 ते 1995 अशी सलग तीन वर्ष चित्ररथ प्रथम पारितोषिकांवर सन्माननीय होण्याची परंपरा लाभली आहे. तेव्हा 1993 साली गणेशोत्सव 1994 साली हापूस आंबा आणि 1995 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आधारित बापू या चित्रपटांनी महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक झाली होती.

हा विक्रम आजपर्यंत इतर कुठल्याही राज्याने मोडलेला नाही. आपल्या राज्याचा चित्ररथ हा दरवर्षी लक्षवेधी उल्लेखनीय आणि विविध अशा संपन्न मराठी संस्कृतीचा प्रदर्शन करत असतो.

संपूर्ण देशभरातून आणि परदेशातून मराठी जनांच्या नागरिकांच्या नजरा महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ कसा असेल याकडे लागलेल्या असतात. 1950 सालापासून आपल्या देशात चित्ररथ संचलनाची प्रथा सुरू आहे आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी अनेक नामांकित व्यक्ति संस्था यांनी काम केले, परंतु गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ नरेंद्र विचारे हे काम करत आहेत.

ध्वज संचालन आणि विविध थरार

दरवर्षी वीस ते तीस चित्ररथ आपल्या राजपथावर विविध राज्यांची संस्कृती, मूल्य, विचारधारा आणि त्यांचे भौगोलिक वेगळेपण मांडत असतात. परंतु या चित्ररथांची निवड प्रक्रिया केंद्रीय संरक्षण मंत्रालयाद्वारे केली जाते. या देशभरातील महत्त्वाचे असे उत्तम काम करणारे 10 ते 12 अनुभवी तज्ञ, चित्रकार, वास्तू विशारद, शिल्पकार, संगीतकार, अभिनेते, नृत्य विशारद हे काम करत असतात. ऐकून नवल वाटेल या प्रत्येक चित्ररथाला 58 ते 62 सेकंद इतकी वेळ मर्यादा घालून दिलेली असते. इतक्या कमी कालावधीत आपल्या राज्याचे वेगळेपण संपूर्ण देशासमोर मांडणे हे काम सोपे नसते.

हे शिवधनुष्य सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेलले आहे. यावर्षीच्या चित्रार्थासाठी साडेतीन शक्तीपठांची निवड केली आहे.यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली आहे. समोरील डाव्या व उजव्या भागास पांरपारिक लोककलेचे वाद्य वाजविणारे आराधी , गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे फिरते मंदिर राहील. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींची प्रतिमा आहेत. यामागे पोतराज आणि हलगी वाजविणारे देवीचे भक्तांची दोन मोठी प्रतिकृती दिसणार. त्यांच्या समोरील भागास लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करणार आहेत. चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा दिसणार आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” असे गीत ऐकू येणार आहे. यासोबतच कर्तव्यपथावरून सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावी व उजवीकडे कलाकार नृत्य सादर करतील.

या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. शुभ ऍड ही संस्था चित्ररथाचे काम करीत असून त्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य कलाकारांचा चमू करीत आहे.

साडेतीन शक्तिपीठाचा महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समूह, ठाणे येथील आहेत.

गेल्या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये सातारा जिल्ह्यातील जैवविविधतेने नटलेल्या कास पठाराचे दर्शन झाले होते.

चित्ररथासाठी दोन महिन्यांपासून प्रत्येक राज्याचे विविध सरकारी विभाग कार्यरत असतात. महाराष्ट्र परिचय केंद्राचे सहकार्य नेहमी असते. संरक्षण मंत्रालयातर्फे प्रत्येक राज्याच्या गटाला एक नवा कोरा ट्रॅक्टर आणि एक ट्रेलर दिला जातो. चित्रांची लांबी 45 फूट उंची 16 फूट आणि रुंदी 14 फूट अशी नियमवार नेमून दिलेली आहे

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!