Maharashtra Politics : भाजप खासदारांची धाकधूक वाढली, डझनभर खासदारांचा पत्ता होणार कट, कोणाकोणाचा नंबर?, जाणून घ्या..


Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यात १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण भाजपला अद्याप तरी महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सोडवला आलेला नाही. भाजप ३२ ते ३७ जागांवर लढण्याच्या तयारीत आहे.

पण पक्ष नेतृत्त्वाकडून करण्यात आलेल्या ३ अंतर्गत सर्व्हेंमुळे आता विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे. याला कारणही तसेच आहे. ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला नाही, त्या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपच्या जवळपास डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती या सर्व्हेमधून मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

येत्या दोन दिवसांत या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजप खासदारांची धाकधूक वाढली आहे. भाजपकडून उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यांसमोर ठेवण्यात आलेला आहे. Maharashtra Politics

येत्या दोन दिवसांत भाजपची जी उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये डझनभर नावे नवीन दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या उमेदवारांची तिकिटे कापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप नेतृत्त्वाकडून करण्यात आलेल्या ३ अंतर्गत सर्व्हेनुसार डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे.

पाच वर्षांतील कामाचा कामगिरीचा आढावा घेऊन भाजपनं खासदारांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं आहे. जनमानसात चांगली प्रतिमा नसणाऱ्या, लोकसंपर्क नसलेल्या खासदारांना डच्चू दिला जाऊ शकतो.

कोणकोणत्या खासदारांचा स्ट्राईक रेट कमी?, जाणून घ्या..

१. बीड- प्रीतम मुंडे
२. धुळे- सुभाष भामरे
३. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी
४. सांगली- संजय काका पाटील
५. लातूर- सुधाकर श्रृंगारे

६. जळगाव- उन्मेष पाटील
७. उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी
८. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन
९. अहमदनगर- सुजय विखे पाटील
१०. नांदेड- प्रतापराव चिखलीकर

११. वर्धा- रामदास तडस
१२. रावेर- रक्षा खडसे

तिकिटे कापण्याची काय कारणे?

स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, ३ पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!