Maharashtra : आता एका क्लिकवर मिळणार जमिनी संदर्भात जुने अभिलेख, जमाबंदी विभागाचा ई -अभिलेख उपक्रमातून मिळणार डिजीटल अभिलेख ..!!


Maharashtra  पुणे : राज्यातील भूमि अभिलेखांचे संगणकीकरण करून ते जनतेला ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जमिनीविषयक जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याकरिता ई-अभिलेख हा महत्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

यामध्ये मुंबई शहर वगळता ३५ जिल्ह्यांतील सर्व तहसील, भूमि अभिलेख व नगर भूमापन कार्यालयातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या २२ जिल्हयांचे स्कॅनिंग कामकाज पूर्ण होऊन ऑनलाइन अपलोड करण्यात आले आहेत. Maharashtra

या २२ जिल्ह्यांतील विविध प्रकारचे अभिलेख जसे की जुने ७/१२, जुनी फेरफार नोंदवही, चालू खाते उतारा, टिपण, आकारबंद, योजना पत्रक, क.जा.प, आकारफोड, जुन्या मिळकत पत्रिका, चौकशी नोंदवही, इ. असाक्षांकित अभिलेख केवळ पाहण्यासाठी https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या संकेतस्थळावर लोकांना विनामूल्य उपलब्ध आहेत.

अभिलेख नागरिकांना घर बसल्या उपलब्ध व्हावेत, याकरिता अपलोडिंग पूर्ण झालेल्या २२ जिल्ह्यांचे स्कॅन झालेले अभिलेख डिजिटली साक्षांकित करणेचे कामकाज महसूल व भूमि अभिलेख विभागाकडून सुरू आहे.

२२ जिल्ह्यांचे जे अभिलेख डिजिटली साक्षांकित झालेले आहेत ते अभिलेख https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचे शुल्क नागरिकांना ऑनलाईन पेमेंट गेटवे द्वारे भरता येईल. उर्वरीत अभिलेख जसजसे साक्षांकित होतील तसतसे जनतेस उपलब्ध करून देण्यात येतील, ते काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे.

या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!