Maharashtra : आनंदाच्या शिध्यात आता अजून ‘दोन’ वस्तूंची होणार वाढ, राज्य सरकारचा निर्णय, जाणून घ्या…

Maharashtra मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय आज (ता. ३) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. Maharashtra

याआधी देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येत होते. मात्र यावेळी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. Maharashtra

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय…
तसेच विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यात येणार असून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात येणार असून ४५ पदांना मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

दरम्यान, राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
