Maharashtra Kesari 2023 : वा रे पठ्ठे! गेल्यावर्षी अपयश आलं पण यावर्षी मैदान मारलं, सिकंदरने अखेर करून दाखवलं…
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी २०२३-२४ च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला दहा सेकंदाच्या चीत करत मैदान मारले. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने आस्मान दाखवत ६६वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा पार पडली. Maharashtra Kesari 2023
या कुस्ती स्पर्धेत अंतिम लढत शिवराज आणि सिकंदर यांच्यात झाली. मागील वर्षीचीच पुनरावृत्ती होणार का? की, सिकंदर डाव पलटवणार याची चर्चा या मैदानात सकाळपासूनच सुरू होती. संध्याकाळी हि रोमहर्षक लढत सुरू झाली आणि अवघ्या एका ३१ सेकंदात झोळी डावावर शिवराज राक्षेला घेत सिकंदर शेखनं मैदान मारलं.
या मैदानानंतर अनेक जणांनी एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो, अखेर सिकंदर शेखनं मैदान मारलेच असे म्हणत सिकंदरचे कौतुक करायला सुरुवात केली. अर्थात गेल्यावर्षीच्या पराभवानंतर एक वर्ष सिकंदर काय करत होता याची चुणूक मात्र या निमित्ताने सर्वांना पाहायला मिळाली. पराभवातून माणसाने हेच शिकावं! पुन्हा एकदा जिंकण्यासाठी उभारी घ्यावी! ही उभारी घेण्यासाठी काय करावे, तेही सिकंदर कडून शिकावं!
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीस पूर्वी ज्या उपांत्य लढती झाल्या त्यामध्ये माती विभागातून सिकंदर शेखने संदीप मोटेचा पराभव केला होता तर गादी विभागातून शिवराज राक्षेने हर्षद कोकाटे चा पराभव केला आणि दोघांनीही दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
मागील वर्षी सेमी फायनल मध्येच सिकंदर शेख ला पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र त्याची कसर त्याने ६६ वा महाराष्ट्र केसरी बनूनच भरून काढली. सिकंदर शेख याच्यावर आता सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.