Maharashtra HSC Result : अखेर उद्या लागणार बारावीचा निकाल, ‘या’ वेबसाईटवर ऑनलाइन पाहता येणार, जाणून घ्या…
Maharashtra HSC Result : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.
त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचे गुण महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in. वर तपासू शकतात.
महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तपासण्यासाठी योग्य नोंदणी क्रमांक/ रोल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. गेल्या वर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला होता. Maharashtra HSC Result
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, ज्यात एकूण ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुलींचा समावेश आहे.
विज्ञान शाखेतून सर्वाधिक ७ लाख ६० हजार ०४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. तर, कला आणि वाणिज्य शाखेतून अनुक्रमे ३ लाख ८१ हजार ९८२ आणि ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी महाराष्ट्र बारावीच्या परीक्षेत, कोकण जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के होते.
या संकेतस्थळांवर पहा निकाल..
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org