महाराष्ट्राला एकाच वेळी मिळणार 2 वंदे भारत एक्सप्रेसची भेट, प्रवासी संख्या जास्त असलेल्या ठिकाणीच होणार रेल्वे सुरू…


मुंबई : वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राला आगामी काळात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे. सध्या राज्यात 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आगामी काळात राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत.

यामध्ये पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी रेल्वे मार्गाची चाचणी नुकतीच संपन्न झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे हे अंतर लवकरच कापता येणार आहे.

याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत या रेल्वे रूटवर प्रवाशांची संख्या अधिक आहे. यामुळे मागणी केली जात होती.

नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांची आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांच्यात नुकतेच एक बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर पुणे रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय झालेला असतानाही या मार्गावर प्रत्यक्षात वंदे भारत सुरू होत नसल्याचा मुद्दा चर्चेत आला.

यामुळे मीना यांनी लवकरच पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होईल अशी माहिती दिली. यामुळे संबंधिक प्रक्रिया देखील लवकरच पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे ते नागपूर आणि मुंबई ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

या गाड्यांमुळे प्रवाशांचा किमान एक ते दीड तास वेळ वाचणार आहे. पुण्याहून सध्या तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत आणि जर पुणे ते नागपूर ही गाडी सुरू झाली तर वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या चारवर पोहोचणार आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!