Maharashtra Election Result 2024 : अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे त्रिकूट मागे का राहिले? केंद्रीय मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा…


Maharashtra Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाकाच लावला होता.

एनडीए ४०० पर्यंत जाईल असा दावा अमित शाह यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएचे ३०० उमेदवारही निवडून आले नाहीत. तसेच महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, एनडीएचा भाग असलेले आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा परिणाम आपण पाहिला आहे.

पत्रकारांनी आठवले यांना विचारले की महाराष्ट्रात एनडीएच्या पराभवाचे कारण काय? तर ते म्हणाले, अजित पवार आमच्याकडे आले होते. जनतेने त्यांना नाकारले आहे. एकनाथ शिंदे यांनी ७ जागा जिंकल्या आहेत. धनुष्यबाण असलेली खरी शिवसेना आहे. Maharashtra Election Result 2024

महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये निवडणुका येत आहेत, आम्ही जिंकू. यावेळी जागा वाटपात विलंब झाला. आम्हाला RPI(A) ला जागा मिळायला हव्या होत्या. विधानसभा निवडणुकीत आम्ही जिंकू, महाआघाडीचे सरकार स्थापन होईल.

दरम्यान, रामदास आठवले म्हणाले, जनतेच्या इच्छेनुसार निकाल लागले आहेत. एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत.

एनडीएचे सरकार स्थापन होईल. जेडीयू आणि टीडीपी आमच्यासोबत आहेत. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत असतील. एनडीएचे मित्र आमच्यासोबत राहतील. असं ते म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!