महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकांचे बक्षीस…!
नवी दिल्ली : महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे. तर उत्तराखंडच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
साडेतीन शक्तीपिठे आणि स्त्रीशक्तीचा जागर’ या थिमवर महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथावर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणीच्या देवींचे मुखवटे दाखवण्यात आल्या होत्या. या चित्ररथाबरोबर गोंधळीही नाचक होते. गोंधळ्यांचे प्रमुख वाद्य असलेले संबळ वाजवणारा गोंधळी चित्ररथाच्या दर्शनी भागी होता. ही साडेतीन शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे असं या चित्ररथामधून अधोरेखित करण्यात आले होते.
एकूण 17 राज्यांच्या चित्ररथांचा ही निवड करताना विचार करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला. पहिला क्रमांक पटकावलेल्या उत्तराखंडच्या चित्ररथाची थीम जीम कॉर्बेट नॅशनला पार्क ही होती. या चित्ररथाच्या पुढील भागी दोन सुंदर हरणं दाखवण्यात आली होती. तिसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशचा चित्ररथ हा अयोध्येमधील दिपोत्सव सेलिब्रेशनसंदर्भातील होता.